
हिमायतनगर प्रतिनिधी/—
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी ग्रामपंचायत च्या निवडणुका जानेवारी महिण्यात होणार आहेत ग्रामपंचायती बिनविरोध निवडूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतीना ५लाखांचा निधी देण्याची घोषणा माधवराव पाटील करंजी कर यांनी केली आहे. हिमायतनगर तालुक्यात जानेवारी मध्ये ग्रामपंचायत च्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी गाव पातळीवर अनेक गट तयार झाले आहेत.निवडणुका एकाच घरातील किंवा मैञीपुर्ण संबंध असलेले एकमेका विरोधात उभे असतात यामध्ये अनेकांनी कायमचे शञुत्व ओढवूनही घेतल्याचे पाहिले आहे.
एरव्ही गुण्यागोविंदाने जगणारे गाव या निवडणुकीत दोन पॅनाल विभागुन वाद विकोपाला गेले आहेत.माञ वादाच्या आणि मनभेदाच्या वळणावर घेऊन जाणारी हि निवडणुक सामोपचाराने आणि गावातील नागरिकांनी एकञ बसुन जर बिनविरोध झाली तर गावातील एकोपा आणि सोहार्द कायम राहिल शिवाय कोरोनाच्या या संकटात व्यस्त असलेल्या प्रशासनावर निवडणुक प्रक्रिया आणि त्यातील अनेक किचकट बाबी पार पडताना तान येतो निवडणुकीत शासनाचा मोठा खर्च होतो.यावर उपाय म्हणून हदगाव हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक गावातील कार्यकर्ते ग्रामस्थांनी हि ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करून ५ लाखांचा निधी गावाच्या विकासासाठी घ्यावा अशी घोषणा . भाजप कार्यकर्त्यां माधवराव पाटील करंजी कर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
