
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी
भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील सालगड्याने आपल्या शेत मालकाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करून शेजारी असलेल्या सुधा नदीपात्रात तिचे प्रेत फेकून दिल्याची दुर्देवी घटना काल जिल्ह्यात घडली या घटनेचा हिमायतनगर येथील अखिल भारतीय आदिवासी मुन्नेरवारलु समाजाच्या वतीने जाहीर निषेध करून आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या कडे हिमायतनगर तहसीलदार यांच्या द्वारे करण्यात आली आहे
भोकर तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील एक शेतमालक त्याची पाच वर्षाची मुलगी दुपारी घरी नसल्याने पाहून तिचा शोध घेतला असता त्याचा सालगडी आरोपी बाबू खंडू सांगेराव याने त्या चिमुकलीला पळवून नेले असल्याचा संशय आल्यावरून भोकर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन भोकर ठाण्यात आणले असता पीडित मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात आणला असल्याचे समजते. प्राथमिक अहवाला नुसार सदरील मयत पीडितेवर पाशवी बलात्कार करून तिचा निर्घृण खून केला असावा असे सांगण्यात येत आहे. या अमानुष घटनेविषयी पीडित मयत मुलीच्या वडिलांनी भोकर पोलिसात फिर्याद दिली ही बातमी कळताच जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे त्यामुळे हिमायतनगर येथील अखिल भारतीय मुन्नेरवारलु तालुका घटनेच्या वतीने आज दिनांक 21 जानेवारी रोज गुरुवारी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करून संबंधित आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक बास्टेवाड,बालाजी तोटेवाड,विपुल दंडेवाड,गजानन मुत्तलवाड, अंबादास दादा,विजय
