तळेगाव येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला

प्रतिनिधी …..परमेश्वर सुर्यवंशी

उमरी तालुक्यात मौजे तळेगाव येथे शिवजन्मोत्सवा निमीत्त कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डिस्टंस पाळून शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्रमुख वक्ते म्हणून शिवरत्न पुरस्कार प्राप्त, शिवश्री सोपान पाटील कदम सांगवीकर उपस्थित राहुन सर्व गावकऱ्यांना अतिशय प्रखर पणे शिवरायांचा इतिहास सांगितला.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव ताटे पाटील, तालुका अध्यक्ष राजेश जाधव पाटील, उमरीचे मा. नगराध्यक्ष संजय कुलकर्णी साहेब, छावाचे (आरोग्य विभाग) नांदेड शहराध्यक्ष रत्नाकर हंबर्डे, संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष शिवश्री योगेश पाटील मोरे, छावाचे राजेश पाटील मोरे, उद्योजक बाळु शिंदे साहेब, तळेगाव चे सरपंच प्रतिनिधी सुरेशराव देशमुख, श्रीकांत देशमुख, मा. सरपंच प्रतिनिधी रामराव कप्पावार, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय देशमुख, दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी बि. व्हि. चव्हाण साहेब, दैनिक पुढारी चे लक्ष्मीकांत देशमुख साहेब, भिमजयंती मंडळाचे रमेश हैबत्ते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय मंडळी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग, शालेय विद्यार्थी, व गावातील सर्व शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.