पोलीस भर्तीची व स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या तरुणांचे भवितव्य अधांरात,राज्यसरकारने लवकर दखल घेण्याची गरज

  • Post author:
  • Post category:इतर

योगेश तेजे (कायर )

प्रत्येक युवकांच्या आशा ध्येय वेगवेगळे असतात आणि त्या आशा ध्येय साध्य करण्यासाठी तरुण धडपडत असतो त्यात पांठिबा असतो आपल्या लेकरांसाठी काबाडकष्ट करणार्या आई वडिलांचा

तसेच आईवडिलांचे आपल्यामुळे समाजात त्यांचे नाव व्हावे असे प्रत्येक तरुणांचे स्वप्न राहतात पण ते तरुणांचे स्वप्न आज मातीमोल होतांना दिसुन येत आहे

कारण राज्यसरकारने गेल्या दोन ते तीन वर्षात एकही पोलीस भर्ती काढलेली नाही त्यात कोरोना महामारि व मराठा आरक्षण या सारखे कारण पोलीस भरती मध्ये येणार नाही व डिंसेबर 2020 मध्ये 12 हजार 528 एवढ्या मोठ्या पदाची पोलीस भर्ती काढण्याची घोषणा केली होती पण ती हवेतच विरतांना दिसुन येत आहे त्यामुळे अनेक पोलीस भरतीची व इतर परिक्षेची तयारी करणारे युवक व युवती नैराश्याने ग्रासल्या जात आहे आज अनेक तरुणांचे आईवडील शेती व मोलमजुरी करुन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जीवाचे राण करुन मुलांना पैसे पुरवतात आणि आपल्या आईवडिलाच्या कष्टाच चीझ करण्यासाठी
विद्यार्थी वाचनालयात तासन तास टक लावुन अभ्यास करतात पण आज त्या युवकांवर नोकरी भरतीवरील बंदी मुळे आत्महत्या करण्याची वेळ येत आहे तर काही तयारी करणारे युवक आत्महत्या करित आहे तर काही विद्यार्थी अभ्यास व अभ्यास करतेवेळी आपल्यासाठी आईवडिलांनी घेतलेले कर्ज फेडण्याकरिता हाँटेलवर रोंजदारीने कामावर काम करतांना दिसत आहे त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवांशी न खेळता येणारी पोलीस भरती व ईतर परिक्षा लवकर घेणे आवश्यक आहे