विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कहर

  • Post author:
  • Post category:इतर

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


गेल्या ३-४ दिवसा पासून मोठ्या प्रमाणात थंड वातावरण तयार झाले आहे.थंड वातावरणामुळे हरबरा व गहू या पिकांना सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असते.
यावर्षी कोरोना, कपाशीवर बोन्ड अळी यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आणखी एक नवं आव्हान मोठ्या प्रमाणात थंडी ज्यामुळे गहू-हरबरा पिकांना नुकसान होऊ शकते.
युरोपातील काही देशांत थंड लहरींमुळे कोरोना चा नवीन प्रकार निदर्शनास आल्याचे दिसत आहे.ज्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने बैठक सुद्धा बोलावली आहे.
वैश्विक आरोग्य धोक्यात आल्याने शास्त्रज्ञांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
थंडीनेच नव्हे तर इतरही बाबींमध्ये विश्वाची सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाली आहे.
२०२० साल शेतकरी, व्यापारी, नोकरदार व सर्वसामान्यांच्या दृष्टीने सुद्धा खूप कटकटीचे आहे,अशी खदखद सर्वांकडूनच व्यक्त होत आहे.