
लता फाळके /हदगाव
वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर विभागातील तालुका कार्यकारणीची नव्याने निवड केल्याची माहिती नांदेड वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये हदगाव तालुकाध्यक्षपदी देवानंद पाईकराव यांची निवड करण्यात आली आहे.
मागच्या अनेक दिवापासून वंचित बहुजन आघाडीच्या नवीन कार्यकारिणीची निवड कधी होणार आणि तालुकाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली होती. याबाबत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. या सर्व इच्छुकांच्या शिफारशी केंद्रीय कार्यकारणीकडे करण्यात आल्या होत्या. अखेर वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर विभागातील तालुक्याच्या कार्यकारिणीच्या निवड नुकतीच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार करण्यात आल्या असून. यात अर्धापुर, भोकर, हिमायतनगर, किनवट, माहूर, हदगाव या तालुक्यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या हदगाव तालुक्याच्या तालुकाध्यक्ष पदी बहुजन समाजाला नेहमी सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून सर्वपरिचित असलेले देवानंद पाईकराव यांची वर्णी लागली आहे. पाईकराव यांच्या निवडी चे सर्वचस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
