चंद्रपूर शहरात मनसेमध्ये युवक व युवतींचा जम्बो पक्षप्रवेश,राजुभाऊ उंबरकर यांची विशेष उपस्थिती

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर


चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या जोमाने कामाला लागली आहे. संपूर्ण जिल्ह्यात अनेक ठिकाणी युवक व युवतींचा मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहे . मनसेचे कार्य, मनसेची सेवा तसेच मनसे कार्यकर्त्यांची जनतेप्रती असलेली तळमळ पाहता जिल्ह्यातील अनेक युवक व युवतींचा मनसेकडे ओघ वाढतो आहे. याच पार्श्वभूमीवर माननीय राजूभाऊ उंबरकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर मनसे नगरसेवक सचिन भोयर यांच्या नेतृत्वात हा जम्बो पक्ष प्रवेश सोहळा मुल महामार्गावरील श्री संत संताजी जगनाडे महाराज सभागृहात पार पडला. चंद्रपूर शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून येऊन पाचशेच्या वर युवक, युवती व महिलांनी मनसे पक्षात प्रवेश केला. अशाप्रकारे मनसेचे प्रस्थ चंद्रपूर जिल्ह्यात वाढतच चालले आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश घेणारा मनसे हा जिल्ह्यातील एकमेव पक्ष आहे.


या जम्बो पक्षप्रवेश सोहळ्याला आलेल्यांना युवक व युवतींना मुख्य मार्गदर्शन माननीय राजू भाऊ उंबरकर यांनी केले तसेच मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी नव्याने पक्षप्रवेश केलेल्यांना पक्षाचे ध्येय, धोरण व दिशा समजावत माननीय राजसाहेब ठाकरे यांना प्रेरित असलेले कार्य महाराष्ट्र सैनिकांच्या हातून घडेल अशी आशा बाळगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार ,शहराध्यक्ष मंदिप रोडे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर ,वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता ,महिला शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर, शहर उपाध्यक्ष महेश वासलवार ,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे ,मनविसे शहराध्यक्ष नितीन पेंदाम, मनसे शहर उपाध्यक्ष नितेश जुमडे ,शाखाध्यक्ष धनराज आंबटकर डॉक्टर आशिष वांढरे ,एडवोकेट मंजु लेडांगे, प्राध्यापक नितीन भोयर ,प्राध्यापिका प्रांजली भोयर ,संजय परदे , सुशील पटले, राकेश पराडकर, सोनू डांगे ,किरण रामीडवार, रोशन रोहने, मंगेश चौधरी राहुल लटारे, समाजसेवक अमित पोल, चिरंजीवी पोल ,अशोक मुद्दा, तुषार राणा, अंकित मिसाळ, साहिल राऊत ,विठ्ठल उगेमुगे आदी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.