
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर
घुगुस येथील कालिदास सीताराम धांडे (27) रा. शेणगाव आज विष प्राशन आत्महत्या केली आहे. त्यास चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
शेणगाव येथील शेतात कंपनीचे टॉवर लागल्याने त्या जागेवर हा इसम लॉयडस मेटल कंपनीत कामावर लागला होता. मागील 7 वर्षा पासून तो कंपनीत काम करीत होता.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठविला आहे. घुग्गुस पोलीस स्टेशन येथे मार्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.
