
वाळकी फाट्यानजीक २०० मीटर अंतरावरील बुरकुलवाडी जवळील घटना
परमेश्वर सुर्यवंशी प्रतिनिधी
हिमायतनगर| माहूर – कोठारी – किनवट – हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाळकी फाट्या पासून २०० मीटरवर असलेल्या पुलाजवळील वळण रस्त्यात चंद्रपूरहून इस्लापूर मार्गे – हिमायतनगरकडे सिमेंट घेऊन येणार ट्रक फसला आहे. या घटनेत चालक- क्लिनर सुखरूप असले तरी एक प्रवाशी गंभीर जखमी झाला असून, पुढील उपचारासाठी त्यास नांदेडदला हलविण्यात आले आहे.
मागील ३ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या माहूर – भोकर या राष्ट्रीय मार्गावरील हिमायतनगर – कोठारी रस्त्याच्या सिमेंटीकरांचे काम संत गतीने का होईना अंतिम टप्प्यात आळे आहे. सदरचे रस्त्याचे काम ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट पद्धतीने करून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. याबाबत अनेक तक्रारी झाल्या, बोगस कामाचे पितळे उघडे पडले, काही ठिकाणी थेट डांबरावरच मुरूम टाकून रस्ता केला गेल्याचे समोर आल्यांनतरही संबंधित ठेकेदारावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने अभियंत्याच्या उपस्थित निकृष्ट कामाचा सपाटा सुरूच आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या रस्त्याला अल्पावधीतच तडे जात आहेत. मराठवाड्यातील भोकर ते विदर्भातील धनोडा या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिमायतनगर ते कोठारी दरम्यान राही कन्स्ट्रक्शन एजंसीच्या एका सब कोन्ट्रैक्टर जयस्वाल (भाईजी) यांच्याकडून केले जात आहे. हिमायतनगर ते इस्लापूर रस्त्याच्या कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करून ठेकेदाराने रस्त्याचे काम उरकण्याचा सपाटा लावला तसेच अनेक पुलाचे कामे अजूनही अर्धवट अवस्थेत असून, या रस्त्याचे व पुलाचे काम करताना अर्धवट पूलामध्ये पडून पांगरी येतथील एका शेतकऱ्याचा तर उमरी येथील एका शिवसैनिकांचा खड्ड्यात पडून बळी गेला आहे.
खरे पाहता सुरुवातील संपूर्ण पुलाचे काम पूर्णत्वास नेऊन रस्ते करण्याचे असताना रस्ता बांधकामाचे सर्व नियम धाब्यावर ठेऊन ठेकेदाराकडून रात्रीला अंधारातही काम केल्या जात आहे. पुलाचे व रस्त्याचे कामात अनियमितता असून, तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पुलाचे व रस्त्याचे काम पूर्ण होणे आवश्यक असताना चालढकल केल्या गेल्याने आजघडीला झालेल्या रस्त्याची क्युरिंग बरोबर झाली नसल्याने तीनतेरा वाजले आहेत. याबाबत किनवट, चिखली, बोधडी, इस्लापूर, पांगरी, हिमायतनगर येथून अनेक तक्रारी झाल्या. एवढेच नव्हेतर तत्कालीन किनवटचे आ.प्रदीप नाईक यांनी देखील तक्रार देऊन ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यावरून चौकशी झाली मात्र ठेकेदारांवर शुल्लक बाब वगळता कोणतीही ठोस कार्यवाही झालीच नाही. उलट याच ठेकेदाराला रस्त्याचे काम पुन्हा करण्याची मुभा देण्यात आली. यानंतर देखील ठेकेदाराने कामात कोणतीही सुधारणा न करता पूर्वीप्रमाणेच निकृष्ट तथा बोगस कामाचा सपाटा सुरूच ठेवला आहे.
याचे जिवंत उदाहरण पांगरी, खैरगाव येथील पुलाच्या कामाची गुणवत्ता राही कंपनीच्या ठेकेदाराने सिमेंटीकरणापूर्वी केलेल्या बेडमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली असून, मजबुतीकरणात टाकण्यात आलेल्या मुरुमांवर कोणतीही दबाई न करता लवकर काम उरकण्याच्या नादात थेट गिट्टी टाकून बेड्चे काम केल्याचे रस्त्याने ये – जा करणारे वाहनधारक सांगत आहेत. त्यामुळे सिमेंट रस्ता होण्यापूर्वीचं या बेडच्या कामाला तडे गेले असून, भविष्यात या बेडवर केल्या जाणाऱ्या सिमेंट रस्ता जास्त काळ टिकेल कि नाही याबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. कारण अश्याच प्रकारचे काम हिमायतनगर – भोकर रस्त्याचे झाल्याने वर्षांपूर्वीच सिमेंट रस्त्यावर मोठोमोठ्या भेगा पडल्याचे उघड झाल्यानंतर ठेकेदाराने व्हाईट सिमेंटने भेगा झाकल्या मात्र पुन्हा हे सिमेंट गेल्यानंतर चार ठिकाणी भेगा पडून निकृष्ट कामाचे पितळे उघडे पडले हे वास्तव आहे.
