हिमायतनगरातून सोनालीका ट्रैक्टरची चोरी; शेतकरी चालकाने दिली पोलीस ठाण्यात तक्रार


परमेश्वर सुर्यवंशी प्रतिनिधी

हिमायतनगर| बटावाणे चालविण्यासाठी घेतलेले सोनालिका कंपंनीचे ट्रैक्टरचे हेड अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना दि.२६ च्या रात्रीला घडली आहे. प्रकारांनी चालक संजय रामचंद्र शिंदे यांनी दिलेल्या तक्रारींवरऔन अद्न्यता चोरट्यावर हिमायतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास पोलीस जमादार बालाजी लक्षटवार हे करीत आहेत.

हिमायतनगर शहर परिसराट गेल्या काही महिन्यापासून चोरटयांनी उच्छाद मांडला आहे. वाहने चोरीला जाणे, दुकाने फोडणे अश्या घटना घडत असताना शनिवारी चक्क ट्रैक्टर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. राजस्थान येथील वाहन चालक हे महाराष्ट्रात सोयाबीन काढणीच्या मशिनी घेऊन हिमायतनगर तालुक्यात दाखल झाले होते. सोयाबीनची कामे आटोपून ते गावी निघून गेले. मात्र वाहन ने – अन ची कटकट नको म्हणून येथील जवळच्या व्यक्तीला बाटवाच्या पद्धतीने वाहने चालविण्यास देऊन गेले आहेत. असेच एका वाहन RJ02RA1439 हे निळ्या रंगाच्या सोनालिका कंपनीचे ट्रैक्टर हेड हिमायतनगर शहरातील प्रताप गल्लीतील रहिवाशी असलेले चालक संजय रामचंद्र शिंदे यांच्याकडे बटावाणे चालविण्यासाठी देऊन गेले होते. वाहन ठेवण्यास घरी जागा नसल्याने त्यांनी सदरचे वाहन हे त्यांचे जवळील शेतकरी रामराव मादसवार यांच्या शेतामध्ये सागवानच्या बागेजवळ उभे केले होते. त्याचबरोबर वाहनात डिझेल व बैटरी नसल्याने कोणीही वाहन हलविणार नाही या भरवश्यावर ते होते.

मात्र दि.२६ शनिवारच्या रात्रीला थंडीचा फायदा घेतात अज्ञात चोरटयांनी आदर्श इंग्ललश स्कुलच्या पाठीमागे असलेल्या रामराव मादसवार यांच्या शेतातील ट्रेकटरची बैटरी व त्यातील डिझेल काढून घेऊन अज्ञात चोरटयांनी सागवानच्या बागेजवळ उभे केलेले अंदाजी ३ लक्ष रुपये किमतीचे सोनालिका कंपनीचे ट्रैक्टर चालू करून चोरून नेले आहे. हा प्रकार रविवारी सकाळी रामराव मादसवार हे शेतात गेले असता ट्रैक्टर जगण्यावर नसल्याचे आढळून आले. हि माहिती समजताच बटावाने ट्रैक्टर चालविण्यास घेतलेले चालक संजय रामचंद्र शिंदे व इतरानाही याबाबतची तक्रार हिमायतनगर पोलिसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सादर ट्रॅक्टर हे डिझेल टाकून बैटरी लावून अज्ञात चोरटयांनी पाठीमागची शेतातून चोरून नेल्याची फिर्याद दिली आहहे. त्यावरून हिमायतनगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० अनुसार कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्क्षणाखाली जमादार बालाजी लक्षटवार हे करीत आहेत.