जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत सिद्धार्थ चव्हाण द्वितीय

प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा

राजुरा:- श्री, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील बी. ए तृतीय वर्षामध्ये पदवीचे शिक्षण घेत असलेले सिद्धार्थ राहुल चव्हाण या विद्यार्थ्याने दि. २९ डिसेंबर २०२० रोजी नॅशनल युथ पार्लमेंट तर्फे आयोजित झिरो बजेट नॅचरल फॉर्मिंग हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे या विषयाची निवड करून ऑनलाईन पार पडलेल्या जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातून सिद्धार्थ राहुल चव्हाण या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर प्रथम क्रमांक अनिकेत दुर्गे या विद्यार्थ्याचा आलेला आहे. या ऑनलाईन स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता. यात निवड झालेल्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या दोन विजेता विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय युवा संसद साठी पात्र केले जाणार आहे. याबद्दल सिद्धार्थ चव्हाण या विद्यार्थ्यांचे त्याच्या शिक्षक, नातेवाईक , मित्रमंडळ, आई वडिलांकडून त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.