अंजनखेड येथे जिवंत नवजात शिशु आढळल्याची घटना…

प्रतिनिधी:गजानन पवार,किनवट

माहुर तालुक्यातील मौजे अंजनखेड येथे एका हाॅटेल च्या समोर असलेल्या टेबलावर सकाळी ४ वा च्या दरम्यान अनओळखी जिवंत नवजात शिशु ( स्ञी लिंगी )आढळले असून लोकनेते ज्योतिबा खराटे व वैद्यकिय महिला कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी यांनी त्या नवजात शिशुला तात्काळ माहुर येथील शासकिय रुग्णालयात नेले आहे. सध्या ते नवजात शिशु सुखरुप असल्याची माहिती आहे.