
प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर
नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये चिमूर तालुक्यात आम आदमी पार्टी तर्फे एकूण १२ उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते यामध्ये भांसुली-अमरपुरी, आंबेनेरी येथील सर्व मिळून ४ उमेदवार जिंकून आले आहेत. तसेच ४ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्याच निवडणुकी मध्ये १२ पैकी ४ उमेदवार निवडून येणे व ४ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असणे ही एक उपलब्धी आहे. यामुळे आपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
