कामारी ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व ११पैकी ९उमेदवार विजयी

प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यातील कामारी ग्रामपंचायत सर्वात मोठी व चुरसीची लढत पाह्याला मिळाली आहे हादगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू अशोकराव पाटील कामारीकर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन ग्रामविकास पॅनल उभे केले सर्व नवतरुण युवकांना त्यामध्ये संधी देण्यात आली तर एकीकडे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पॅनल त्यांच्या नेतृत्वाखाली उभे केले गेले जो तो आपली ताकत लावु लागले कामारी हे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहीला आहे जिल्हा परिषद सदस्य देखील काँग्रेस चा आहे तर जिल्हा अध्यक्ष म्हणुन याच गणातुन निवड करण्यात आली होती त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी आपले वर्चस्व सहज प्रस्थापीत करु शकले त्यामुळे पॅनलप्रमुख अशोक शिरफुले यांनी आपल्या पुर्ण बहुमताने उमेदवार विजयी करुन कामारी ग्रामपंचायत वर पुन्हा एकदा तिरंगा फडकवला आहे त्यामुळे कामारी गणात काँग्रेस पक्षांची ताकत वाढली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला यांचा मोठा फायदा होणार आहे असे चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे आज माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पॅनला ११पैकी ३वर समाधान मानावे लागले आहे हिमायतनगर तालुक्यात जवळपास ६५% निकाल काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागला आहे तर उर्वरित निकाल भाजपा व सेना व बहुजन आघाडी पक्षाची चाहुल लागली आहे असे चित्र निर्माण झाले आहे आज कामारी ग्रामपंचायत मध्ये मतदार यांनी परिवर्तन ग्रामविकास पॅनला बहुमतांनी विजयी करून दिल्या बद्दल सर्व मतदारांचे आभार मानले आणि आम्हाला दिलेल्या संधीचे आम्ही सोनं करु गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहु असे वक्तव्य पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.