
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
“
२०११ पासून सुरु असलेल्या व भद्रावती शहरात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या “द बेस अकादमी” ला राष्ट्रीय स्तरावरील “ग्लोबल टीचिंग एक्सलन्स अवॉर्ड्स २०२०” अंतर्गत “बेस्ट कोचिंग इन्स्टिटयूट” ने सन्मानित करण्यात आले.
शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे अपवादात्मक समर्पणाला सन्मानित करण्यासाठी सदर सोहळा २७ डिसेंबर २०२० ला आयोजित करण्यात आला होता .
कोरोना चा पार्श्वभूमीवर हा ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्यात आला.
काईट्सक्राफ्ट प्रॉडक्शनने या कार्यक्रमाचे आयोजन अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी केला ज्यांनी तरुणांना मनापासून चांगल्या भविष्याकडे नेण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत आणि त्यांना प्रत्येक मार्गाने मार्गदर्शन केले . पुरस्कारप्राप्त व्यक्तींची व संस्थांची निवड नामांकन प्रक्रिया व जूरीद्वारे विविध बाबींचा विचार करून व संपूर्ण संशोधनाद्वारे करण्यात आली.
या कार्यक्रमाद्वारे देशभरातील नामांकित लोकांचे अनुभव आणि अभूतपूर्व विचार सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व शैक्षणिक संस्था आणि व्यक्तींचे अनुकरणीय योगदानास मान्यता मिळावी यासाठी हा पुरस्कार होता.
पुरस्कारकर्त्यांना प्रमुख अतिथी – प्रा. डॉ. एच. के. सरदाना (मुख्य वैज्ञानिक CSIO) द्वारा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं.
सदर सन्मानासाठी संस्थेचे डायरेक्टर डॉ. विवेक शिंदे व प्रा. प्रशांत तेलंग यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आले .
