पेट्रोल-डीझेल भाववाढी विरुद्ध आप चे चंद्रपूरात निषेध आंदोलन

दि. ४ फेब्रुवारी २०२१

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर

पेट्रोल आणि डिझेलच्या कर कपातीची ‘आप’ ची मागणी‘ या सरकारची कामगिरी भारी, पेट्रोलने गाठली शंभरी !’ ,‘मोदी सरकारकडे करा अर्ज, पेट्रोल डीझेलसाठी द्या आम्हाला कर्ज’पेट्रोलचे दर शतकी वाटचाल करत असताना केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल,डीझेल वरच्या अबकारी कर सवलतीची अपेक्षा पूर्ण फोल ठरली आहे. त्यामुळे
पेट्रोल– डीझेल वरच्या अबकारी करत मोठी कपात करावी अशी मागणी करत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपुर येथे आज तीव्र आंदोलन केली.
‘मोदी सरकारची कामगिरी भारी, पेट्रोलने गाठली शंभरी!’ , ‘मोदी सरकारकडेकरा अर्ज , पेट्रोल डीझेलसाठी द्या आम्हाला कर्ज, रावणाच्या राज्यात ५१ रुपये तर रामाचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या सरकारचे भाव ९३, ‘ अश्या घोषणा दिल्या. त्यास नागरिक ही उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते.मागच्या वर्षाच्या सुरवातीला पेट्रोल चे भाव ७८ रुपयाच्या जवळपास होते.कोरोना काळात सर्वच व्यवहार थांबले होते. लॉकडाऊनमुळे वाहतूक पूर्ण बंद
होती. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ओईल ला घेवालाच नव्हते, त्यामुळे
क्रूड ओईल चे भाव अगदी खालच्या स्तरावर पोहचले आहेत. तरीही जनविरोधी मोदी सरकार कडून महामारीच्या काळात पेट्रोल-डीझेल वरील अबकारी कर मोठ्या प्रमाणात वाढवून जनतेला लुटण्याचे महान कार्य हे सरकार करीत आहे. त्या वाढीव कराची झळ आता सामान्य माणसास झळ बसत आहे . पेट्रोल- डिझेलमध्ये झालेल्या या भाववाढीमुळे आम आदमी आणि आम औरत यांना
जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीचा सामना आता करावा लागत आहे. ‘जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या, २००८ जुलै मध्ये प्रती बॅरल १४२ डॉलर तर २०१२ फेब्रुवारी मध्ये प्रती बरल १२५ डॉलर होत्या त्या आता केवळ ५५ डॉलर वर आहेत. याचा फायदा जनतेला थेट स्वरुपात दिला असता तर अर्थ व्यवस्थेला थोडी उभारी मिळू शकली असती. सामान्य जनतेच्या खिशाला
आधार देण्या ऐवजी महागाईचा फटका जनतेला आणि आर्थिक सवलती अंबानी-अदानी सारख्या काही मोठ्या उद्योजक मित्रांना असे मोदी सरकारचे उरफाटे धोरण आहे.’ असे या वेळेस इंजि. प्रशांत प्रभाकर येरणे अध्यक्ष आम आदमी यांनी सांगितले. २०१४ मध्ये पेट्रोल वरचा अबकारी कर – एक्साईज ९.२० रुपये होता, तो २०१७मध्ये २१.४८ रुपये झाला आणि आता केंद्र सरकार तब्बल एक लिटर पेट्रोल मागे
३२.९८ रुपये तर डीझेल वर प्रती लिटर ३१.८३ रुपये कर लावण्यात येत आहे. तसेच राज्य सरकार VAT च्या माध्यमातून पेट्रोल वर२८.९८ आणि डीझेल वर १९.६६ रुपये आकारणी करते, त्यामुळे आज राज्यात मूळ २७.७५ रुपये प्रती लिटर च्या पेट्रोलची विक्री किंमत ९२.५० तर डीझेल ची किंमत ८२.६८ पर्यंत पोहचली आहे. केंद्र सरकार आकारत असलेला अवाजवी अबकारी कर कमी करावा अशी मागणी आम आदमी पार्टीने आंदोलनच्या माध्यमातून केली आहे.

या वर्षीच्या केंद्रीय अर्थ संकल्पात केंद्र सरकार मध्यमवर्गीय माणसाला
दिलासा देवू शकले असते परंतु सरकारने कोणताही दिलासा दिलेला नाही.लॉकडाऊन मुळे आलेल्या आर्थिक मंदीनंतर आता महागाईच्या ओझ्याखाली गरीब जनता दबून जाणार आहे.दुसरीकडे आप चे सरकार असलेल्या दिल्लीत पेट्रोल ची विक्री किमत ८६.३०
प्रती लिटर आहे. हा दर महाराष्ट्रातील पेट्रोल दरापेक्षा तब्बल ६.१०
रुपयांनी कमी आहे. याचे कारण महाराष्ट्र सरकार आकारत असलेल्या व्हॅट सुद्धा जास्त आहे. दिल्ली सरकारच्या दीडपट कर महाराष्ट्र सरकार आकारते.त्यामुळे महाराष्ट्र सरकारची इच्छा शक्ती असेल तर ते सुद्धा सामान्य जनतेस दिलासा देऊ शकते. आज शहरात इंजि.प्रशांत प्रभाकर येरणे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात
आले, या आंदोलनात आम आदमी पार्टीचे संघटन मंत्री श्री.सुनिल रत्नाकर भोयर, सचिव श्री. राजू कुडे, चंद्रपुर जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष श्री. सुनिल देवराव मुसळे, सचिव श्री. संतोष दोरखंडे ,शहर कोषाध्यक्ष श्री. अशोक आनंदे,श्री.भिवराज सोनी कोषाध्यक्ष ( ग्रामीण)उपाध्यक्ष बबन क्रिश्नपल्लीवर, सिकंदर सागोरे, योगेश आपटे,अजय डुकरे,वामन नंदुरकर, शंकर धुमाळे, सुखदेव दारूण्ड़े, मनोज मिश्रा, सागर चौधरी, दिलीप तेलंग,मयुर राईकवार,सुशांत धकाते,संदीप तूरक्याल, वैशाली डोंगरे, रिझवान खान पठाण, भुवनेश निमगडे, शहारुख शेख़,पपेश शेन्दरे, श्री. राजेश चेडगुलवार (जिल्हा, महानगर सोशल मीडिया हेड)
इत्यादी पदाधिकारी व
कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते. आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.