महाकाली कॉलरी चंद्रपूर तसेच परिसरातले रोडचे नवीन बांधकाम लवकरात लवकर सुरू करा

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहर उपाध्यक्षा वाणिसदालावार यांचे महापौरांना निवेदन

चंद्रपूर प्रतिनिधी :- चंद्रपुर शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असुन त्या रस्त्याचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने महापौर चंद्रपुर यांना मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनातून केली आहे.चंद्रपुरातील महाकाली कॉलरी व परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून संबंधित खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत येथून ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना या रस्त्यावरुन चालणे अवघड झाले असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतकेच नाही तर पाइपलाइनच्या खोदकामामुळे ठिकठिकाणी पाणी साचुन असते याचा नाहक त्रास येथील नागरिकांना होत आहे त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी जातिने लक्ष द्यावे व बागला चौक ते महाकाली कालरी आणी रय्यतवारी कालरी बिएमटि चौक ते मानवेंद्र बायपास रोड चे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे जेणेकरून येथील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही. आपल्या स्थरावर योग्य चौकशी करून संबंधित रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम नव्याने लवकर सुरू करा अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हा अध्यक्ष सुनिता गायकवाड , जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, महिला सेना जिल्हा सचिव अर्चना आमटे,तालुका उपाध्यक्ष क्रिष्णा गुप्ता,तालुका उपाध्यक्ष मनविसे प्रविण शेवते, शैलेश सदालावार इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.