‘राम सेतू’ असे इराई नदीवरील ब्रिजला नामकरणाची मंजुरी.

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

इरई नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, हा पूल आता लोकसेवेत रुजू झाला आहे. अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून दाताळा रोडवरील इरई नदीवर उभारण्यात आलेल्या भव्य ब्रिजला ‘रामसेतू’ हे नाव देण्याचा ठराव २३ जून रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिककेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात आज सर्वसाधारण सभा पार पडली.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांनी सभागृहात अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून दाताळा रोड मार्गातील इरई नदीवर उभारण्यात आलेल्या भव्य ब्रिजला ‘रामसेतू’ हे नाव देण्याची मागणी केली. ब्रीजमुळे चंद्रपूर शहराचे नावलौकिक झाले. ब्रिजच्या आकर्षणामुळे अतिशय कमी कालावधीत स्टेड-ब्रिज संपुर्ण शहरवासीयांसाठी एक पर्यटन स्थळ ठरले आहे. त्यामुळे संपुर्ण शहरवासी इरई नदी दाताळा रोड या मार्गात उभारण्यात आलेल्या भव्य ब्रिज बघण्यासाठी येत असतात. या ब्रिजला ‘रामसेतू’ असे नाव देण्याचा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, सभागृह नेता संदीप आवारी, भाजपचे गटनेता वसंत देशमुख, विरोधी पक्षनेता डॉ. सुरेश महाकुलकर, बसपचे गटनेता अनिल रामटेके, शिवसेनेचे गटनेता सुरेश पचारे आदींसह आभासी माध्यमातून झोन सभापती, सर्व नगरसेवक उपस्थित होते.