

प्रतिनिधी:अंकित निवलकर, बल्लारपूर
विद्युत बिला संदर्भात बल्लारपूर तालुका मनसे आक्रमक
आज दि ११/०२/ २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पार्टी तर्फे वीज वितरण कंपनी कार्यालय बल्लारपूर इथे मनसेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ रामीडवार,मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपुर विधानसभा क्षेत्र किशोर भाऊ मडगुलवार यांच्या प्रमुख उपस्थीतीत महीला सेना क्लपनाताई पोर्तलवार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली व संबंधित अधिकाऱ्यांना वीज बिला संदर्भात निवेदन देण्यात आले,
तालुक्यातील कोणत्याही वीज ग्राहकाचे वीज पुरवठा खंडित करू नये अशी सूचना व निवेदन देण्यात आले, तसेच वीज कापण्यासाठी कोणताही कर्मचारी गाव/ खेड्यात आल्यास गंभीर परिणाम होतील अश्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या . यावेळी मनसे बल्लारपूर महिला सेना तालुका अध्यक्षा कल्पनाताई पोर्तलावार व राजुरा तालुका अध्यक्ष राजु गडुम सुरज भामरे राजुरा ता उपध्यक्ष महीला सेना शहर अध्यक्ष मंगला गाडले वारालक्ष्मी जंर्जार्लावार संपदा चांदवार संगीता वनकर इंद्र काडताडे क्रिष्णा पोर्तलावार कुष्णा पोतुलवार जिवन गेडाम विजु देशपांडे आदी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.
