
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,घुग्गुस
चंद्रपुर : उपविभागीय दंडाधिकारी चंद्रपुर यांनी दि. 23 डिसेंबर 2020 ला केलेल्या उद्घोषणे नुसार मु. पो. का. कलम 85 द्वारे घुग्घुस पोलीस स्टेशन येथे चार ते पाच वर्षांपासून दुचाकी वाहने बेवारस स्थितीत पडून आहेत. ही सर्व वाहने पोलीस स्टेशन येथे जमा असून या वाहनावर कोणीही दावा, हक्क दाखल केलेला नाही.
घुग्घुस येथील उपनिरीक्षक यांनी कार्यालयास काळविल्या नंतर सदर वाहन कोणाच्या मालकी हक्काचे असतील त्यांनी पुराव्यासह पोलीस स्टेशन येथे उद्घोषणे च्या प्रसिद्धी पासून साठ दिवसाच्या आत दावा दाखल करावा. विहित कालावधी नंतर कोणाचाही दावा, हक्क, तक्रार दाखल करून घेतली जाणार नाही असे उपविभागीय दंडाधिकारी चंद्रपुर यांनी कळविले आहे.
