फेब्रुवारी महिन्याचा तिसरा सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी ‘महिला लोकशाही दिनाचे’ आयोजन

प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर

चंद्रपुर : फेब्रुवारी महिन्याचा तिसरा सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी ‘महिला लोकशाही दिनाचे’ आयोजन सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एकप्रकारे व्यासपीठ, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हा, विभाग, मंत्रालय व तालुका स्तरावरील महिला लोकशाही दिन पाळण्याबाबत निर्णय झालेला आहे.

सदर महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवविषयक आस्थापने प्रकरणे वगळून इतर वयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी निवेदन स्वीकारण्यात येतील. तसेच जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तक्रार अर्ज स्वीकारण्यात येतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.