



प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा
महिला सक्षमीकरण करण्यासाठी इनर व्हील क्लब,वरोरा कडून जागतिक महिला दिनानिमित्त
6,7,8 मार्च ला self defence and attacking techniques and marshal arts चे तसेच योगनृत्याचे 3 दिवसीय शिबीर आयोजन गांधी उद्यान वरोरा येथे करण्यात आले .या कार्यक्रमात वरोरा शहराचे माजी सैनिक सागर कोहळे व मार्शल आर्ट ट्रेनर रवी चरूरकर (एअर बॉर्न ट्रेनी ग्रुप वरोरा) यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले.
या शिबिरात शहरातील विविध भागांतील मुलींनी सहभाग घेतला.महिलांवर होणारे अत्याचार पाहता स्वतःचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे या उद्देशाने इनर व्हील क्लब,वरोरा च्या
सौ. सीमा लाहोटी – प्रेसिडेंट ,सौ. अपूर्वा बुजोणे – सेक्रेटरी व एअर बॉर्न ट्रेनि ग्रुप वरोरा यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
