मासळ ग्राम पंचायत मध्ये आर्थिक गैरव्यवहार पोलीस स्टेशन मार्फत गुन्हे शाखेला दिली तक्रार.

प्रतिनिधी:गुरुदास धारने,मासळ(चिमूर)

चिमूर तालुक्यातील मासळ ग्राम पंचायत मध्ये लाखोंचे गैरव्यवहार झाला असून नव्याने निवडून आलेले सर्व सदस्य ची पहिली सभा 26 मार्च ला आर्थिक व्यवहार तपासणे व जमा खर्च तपासणे व जमा खर्च मंजूर करणे.या विषयावर झाली परंतु ग्रामसेवक पी एम लामगे यांनी जमा खर्च दाखविला नाही व विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यामुळे मासिक सभेत जमा खर्च नामंजूर करून आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर द्वारे चौकशी करण्याकरिता ठराव मंजूर करण्यात आला परंतु ठरावाची प्रत न देता ग्रामसेवक सभेमधून पळून गेला.तेव्हा दि.28 मार्च ला पोलीस स्टेशन चिमूर मार्फत पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांनी तक्रार दाखल केली. यात गृहकर,पाणिकर,सामान्य पावती कर आणि 14 वा वित्त आयोग याचा जमा व खर्च किती झाला याचा हिशोब पाहला असता यात लाखोंचा भ्रष्टाचार झाले असे दिसून आले.
सण 2019-20 या आर्थिक वर्षात गृहकर पाच लाख चाळीस हजार आठशे अठ्ठावन ,पाणीकर एक लाख एकोणसाठ हजार आठशे अठरा ,दुकान गाडे किराया एक लाख पंचवीस हजार आणि 14 वा वित्त आयोग चार लाख चाळीस हजार दोनशे छप्पन रुपये एवढा आहे.परंतु सदर खर्च ग्रा पं ला दिला नाही तो परस्पर खर्च करण्यात आला. त्यामुळे लाखोंचे भ्रष्टाचार दिसून आले. तसेच ग्रा पं कर्मचारी पाणीपुरवठा शिपाई यांचे दोन वर्षाचे वेतन इलेक्ट्रिक साहित्य खरेदी ,साउंड सर्व्हिस,हॉटेल,इलेक्ट्रिक दुरुस्ती,किराण्याची उधारी असे एख लाख एकोणचाळीस हजार पाचशे देने बाकी आहे,तसेच सामान्य फंड मध्ये फक्त 3500,पाणीपुरवठा खात्यात 1800 रुपये बाकी आहेत. तसेच चालू वर्षात इलेक्ट्रिक साहित्य खरेदीत 22500 रुपये उधारी दाखवली आहे. परंतु त्याचे बिल रेकॉर्डला उपलब्ध नाही . त्यामुळे ग्रामसेवक लामगे यांनी आर्थिक गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केला हे उघड होते.त्यामुळे सण 2015-21 पर्यंत आर्थिक व्यवहाराची चौकशी करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर व उचित कारवाही करावी अशी ग्राम पंचायत मासळ ने तक्रार नोंदवली आहे.