चिमूर तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, प्रशासनाने निष्काळजीपणा करू नये–आमदार बंटीभाऊ भांगडीया

प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर

कोरोना संदर्भात प्रशासकीय बैठक

चिमूर शहर व तालुक्यात कोरोना महामारी झपाट्याने वाढत असून,प्रशासन मात्र नरमाईचे धोरण अवलंबित असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे,विना मास्क फिरणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याचे आवश्यक असून,कोरोना लसीकरनाचा वेग सुद्धा वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी गाव पातळीवर एक समिती तयार करून कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे आवश्यक असल्याचे निर्देश चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय #श्रीबंटीभाऊभांगडीया यांनी दिले.

चिमूर तहसील कार्यालयात कोरोना आजार नियंत्रण आढावा बैठकीत आमदार

बंटीभाऊ_भांगडीया* बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने भाजपा जि.प.उपाध्यक्षा सौ.रेखाताई कारेकर,भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे,एस.डी.ओ संकपाळ साहेब,आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार बंटीभाऊभांगडीया* म्हणाले की कोरोना लसीकरणाची गती वाढवून चिमूर शहरात दररोज सुमारे दोनशे कोरोना लसीचे डोज देण्याचे उद्दिष्ट ठेवणे गरजेचे असल्याचे सांगुन चिमूर तालुक्यातील भिसी,शंकरपुर,नेरी,मासळ,खडसंगी या मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये लसीकरणाकरिता जलद उपाययोजना करून निष्काळजीपणा वा नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे दिशानिर्देश या बैठकीतून त्यांनी दिले.तसेच कोणालाही काहीही अडचण आल्यास त्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

या बैठकीत आदरणीय आमदार साहेबांनी कोरोना नियंत्रणाकरिता मार्गसूचक सूचना केल्या :-

कोरोना लसीकरण जलद गतीने व्हावे याकरिता वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर्स,आशा वर्कर्स यांच्यासोबत समन्वय साधून सूक्ष्म नियोजन करणे.

प्रत्येक गावा-गावांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझेशन करणे.

सार्वजनिक,सामाजिक,स्थळांवर सॅनिटायझेशन करून मास्क वापरण्याचे कडक निर्बंध लावणे व हे नियम न पाळणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करणे.*

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.भगत साहेब,डॉ.अगडे साहेब,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम साहेब,नायब तहसीलदार कोवे साहेब,चिमूर तालुका कृषी अधिकारी तिखे साहेब,न.प.चिमूर प्रशासना तर्फे चौगुले साहेब,चिमूर पं.स.चे बी.डी.ओ पुरी साहेब चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार शिंदे साहेब,भिसी पोलीस स्टेशन चे ठाणेदार गभणे साहेब व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

तसेच,या बैठकीस भाजपा पदाधिकारी डॉ.श्यामजी हटवादे,राजुभाऊ देवतळे,समीरभाऊ राचलवार,विनोदजी चोखरे,प्रशांतजी चिडे,अशोकजी कामडी,नाना मेश्राम,अजय शीरभैय्ये,रमेशजी कंचर्लावार,संजय कुंभारे,अरुण लोहकरे,विकी कोरेकर,सुरज नरुले ,हरीश पिसे,योगेश सहारे,शैलेश पाटील,अरुण सालेकर आदी उपस्थित होते._

MLA_Bunty_Bhangdiya.

BJP_Chimur.