कोविड 19 च्या प्रतिबंध उपाय योजना उपलब्ध
करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी घेतला पुढाकार

राज्यात संपूर्ण कोरोना संकट असल्याने कोरोना रुग्णांना मृत्युमुखी व्हावे लागत आहे कारण आरोग्य विभागात सोयी सुविधा उपलब्ध नाही तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी जनतेच्या सुरक्षेसाठी चिमूर व नागभीड मध्ये विविध सोयी सुविधा असलेले यंत्र खरेदी करण्यासाठी स्थानिक विकास कार्यक्रम सन 21-22 अंतर्गत निधीतून 1 कोटी 13 लक्ष रुपये निधी मंजूर करण्याचे पत्र देण्यात आले असून चिमूर व नागभीड ला डेडीकेट कोविड जँबो हास्पिटल कोविड रुग्णाच्या सुरक्षेसाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया सरसावले आहेत.
कोरोना ची भयानव स्थिती पाहता कोरोना रुग्णांना सोयी सुविधा अभाव असल्याने कोरोना रुग्ण मृत्यू मुखी झाले आहे जनतेत भीती निर्माण झाली आहे तालुका स्तरावरील कोरोना रुग्णांना चंद्रपूर, नागपूर,ब्रम्हपुरी ,गडचिरोली येथे बेड मिळत नाही रुग्ण व त्यांच्या नाते वाइकाना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे .तेव्हा चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेची भावना लक्षात घेऊन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी पुढाकार घेत आपल्या स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून कोविड 19 प्रतिबंधित उपाय योजना विविध सोयी सुविधा यंत्र खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निधी मंजुरी साठी पत्र दिले आहे.
डेडीकेट कोविड हास्पिटल चिमूर सेंट्रेलाईज ऑक्सिजन पाईपलाईन सिस्टम 150 जँबो सिलेंडर वर खर्च करणे 22 लक्ष रु , ऑक्सिजन क्रांस्ट्रेटर 10 लिटर 15 नग 9 लक्ष रु , ऑक्सिजन फ्लॉमीटर 50 नग 1.20 लक्ष रु ,रेमडीसिव्हर इंजेक्सन 300 नग 3.60 लक्ष रु,
तर नागभीड डेडिकेट कोविड हास्पिटल 100 सिलेंडर वर खर्च करणे 15 लक्ष रु, ऑक्सिजन क्रांसट्रेटर 10 लिटर 10 नग 6 लक्ष रु, ऑक्सिजन फ्लामीटर 30 नग00 . 75 लक्ष रु, रेमडीसवर इंजेक्शन 200 नग 2 .40 लक्ष रु तसेच चिमूर व नागभीड नगर परिषद अंतर्गत शासकीय उपजिल्हा रुग्णालय व अन्य करीता 108 धरती वर टाटा विंगर एसी अद्यावत रुग्ण वाहिका 2 किंमत 36 लक्ष रु, टाटा मॅजिक नांन एसी अद्यावत रुग्णवाहिका 2 किंमत 18 लक्ष रु प्रमाणे नियोजन करण्यात आले असून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले .
