चंद्रपुरात हल्दीराम रेस्टॉरंट, उत्सव लॉन, कोचिंग क्लासेस वर कारवाई

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

.

चंद्रपूर : कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन, इंस्पायर कोचिंग क्लासेस, इनसाईट कोचिंग क्लासेस व इतरांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच हल्दीराम रेस्टोरेंटला ५ दिवस बंद ठेवण्याची ताकीद देण्यात आली आहे.

मनपा पथकामार्फत झोन क्र. ३ अंतर्गत पाहणी सुरु असताना उत्सव लॉन येथे लग्न कार्य सुरु असल्याचे आढळून आले. या लग्न कार्यात ५० पेक्षा जास्त लोक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे लॉन मालकास दंड करण्यात आला.
हल्दीराम रेस्टोरेंटचे काही कर्मचारी याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले होते त्यामुळे मनपा आरोग्य विभागाद्वारे त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले होते मात्र चाचणी न करता कर्मचारी कामावर आढळुन आले म्हणून ५ दिवस रेस्टोरेंट बंद ठेवण्याची कारवाई करण्यात आली.
कोचिंग सेंटर बंद ठेवण्याचे आदेश असतांना इंस्पायर कोचिंग क्लासेस , इनसाईट कोचिंग क्लासेस व इतर कोचिंग मालकांनी शिकवणी वर्ग सुरु ठेवले तसेच येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आढळून आल्याने व कुठेही सोशल डिस्टनसिंगचे पालन केले नसल्याने सर्व शिकवणी वर्गांकडुन दंड वसुल करण्यात आले.
कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या मॅरेज हॉल, लॉन, हॉटेल्स, दुकाने, प्रतिष्ठानांवर दंड ठोठवावा व प्रसंगी सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त राजेश मोहिते यांनी यापूर्वीच दिले होते.