धक्कादायक:अन्न पाण्याविना तडफडत माय लेकाचा मृत्यू

शहरातील यात्रा वॉर्ड या भागात अंकुश जगदीश खोब्रागडे वय वर्ष 50,आई द्रौपदाबाई जगदीश खोब्रागडे (80) याचा मागील 3-4 दिवसापासून अन्न पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
शहरातील यात्रा वॉर्ड येथे त्यांचे स्वतः चे घर होते त्या घराच्या काही जागेची विक्री करून त्यांचा मुलगा मुंबई येथे काम करायला गेला .त्यामुळे अंकुश जगदीश खोब्रागडे हा पोलिओ ग्रस्त होता .त्यामुळे मागील काही दिवसापासून प्रकृती ठीक नसल्याने तो घरीच होता.त्यात मृत द्रौपदाबाई या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याने घराजवळ असलेल्या जानवे यांच्या कडे खानावळीत डब्बा ची सोय करून दिली होती. मागील काही दिवसापासून खोब्रागडे आई वा मुलगा कोणीच डब्बा आणायला न गेल्याने खानावळ मालक जानवे यांनी चौकशी केली असता घरातून दुर्गंधी सुटल्याचे लक्षात आले.पोलीस स्टेशन वरोरा चे ए पी आय चवरे ,यांच्या सहकार्यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.