महाराष्ट्र तैलिक प्रांतिक महासभेच्या युवा विभागीय उपाध्यक्ष पदावर शरद जी तराळे यांची निवड

समाजातील एक क्रियाशील कार्यकर्ते, समाज कार्यात मोलाचे योगदान देणारे शरदजी तराळे यांची महाराष्ट्र तैलिक प्रांतिक महासभेच्या युवा विभागीय उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. समाजाच्या प्रत्येक कार्यात पुढाकार घेत ,समाजाच्या प्रत्येक प्रश्ननाला वाचा फोडून न्याय मिळवून देणाऱ्या या सच्चा कार्यकर्त्यांचा आज सन्मान करण्यात आला .
वणी शहरातील धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.या नियुक्ती नंतर जिल्हाभरातील समाजबांधवांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे .पुढील कार्यास शुभेच्छा .

हि निवड अमरावती – यवतमाळ विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे,विभागीय महासचिव राजेंद्र हजारे आणि विभागीय युवा अध्यक्ष सागर शिरभाते यांच्या नियुक्ति पत्रान्वये करण्यात आली आहे. या नियुक्ति मुळे वणी परिसरातील तैलिक समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.