
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे.
हिंगणघाट प्रतिनिधी, दि.६ मेस्थानिक स्वामी विवेकानंद वार्ड येथील ३३ वर्षीय विवाहित इसमाने कानापुर शिवारात गळफांस घेतल्याची घटना आज गुरुवार रोजी उघड़किस आली.आज सकाळी ७ वाजताचे दरम्यान या युवकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली असून त्याने लॉकडाऊन काळात आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर मृतकाची शितरंजन दशरथ बावणे(३३) अशी ओळख पटली असून मृतक हा काल रात्री ९ वाजेपासून घरुन बेपत्ता झाला होता. आज दि.६ रोजी त्याचा शोध घेतला असता वेणा नदी पलीकडील विठ्ठलमूर्तीच्या परिसरातील कानापूर शिवारात एका शेतात त्याचा मृतदेह आढळला.सदर युवक विवाहित असून त्याचेमागे पत्नी व एक लहान मुलगी असा आप्तपरिवार आहे. वाहनचालक म्हणून खाजगी काम करुन तो आपला प्रपंच चालवित होता.परंतु लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने कुटुंबियांचा सांभाळ करणे अवघड झाल्याने विमनस्क स्थितीत त्याने गळफास लावून आपली इहलोकाची यात्रा संपविली. पुढील तपास पो . महेंद्र आकरे करीत आहे
