


राजुरा (प्रतिनिधी):उमेश पारखी
कोरोनाचे लोण शहरातून हळूहळू ग्रामीण भागातही पसरू लागले आणि बिमारीची तीव्रता मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही जाणवू लागली,तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णास बेड मिळणे कठीण होऊन बसले आणि अशा बिकट प्रसंगी राजुरा तालुक्यातील वरूर या ठिकाणी सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीने आपले सामाजिक दायित्व म्हणून ग्रामस्थांना 20 बेड उपलब्ध करून दिले आणि विलगिकरण कक्षाची सुरुवात झाली.
ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणि वरूर साजा येथील तलाठी विनोद गेडाम यांच्या पुढाकाराने प्रस्तुत विलगिकरण कक्षाचे लोकार्पण करण्यात आले.वरूर हे गाव केंद्रस्थानी असून येथे सुरू केलेल्या विलगिकरण कक्षाचा लाभ परिसरातील भेदोडा,रानवेली, टेम्बुरवाही इत्यादी गावांना होणार आहे.स्थानिक गावकऱ्यांनी आणि तलाठी यांनी सोलर इंडस्ट्रीजचे मॅनेजर श्री.वसंतराव वरारकर यांच्याशी संपर्क साधून विलगिकरण कक्ष सुरू करण्यासाठी मदत मागली आणि सामाजिक दायित्व समजून कंपनीने 20 बेड उपलब्ध करून दिले.या विलगिकरण कक्षाचा ग्रामस्थांना निश्चितच खूप मोठा आधार झालेला असून यात शासनाच्या मदतीशिवाय ग्रामस्थांचे सहकार्य खूप अभिनंदनीय ठरले आहे.विलगिकरण कक्ष उदघाटन प्रसंगी रुग्णांना जेवणाची आणि नास्त्याची सोय गावकऱ्यांतर्फे करण्यात आली.
या विलगिकरण कक्षाचे उदघाटन माननीय उपविभागीय अधिकारी
श्री. संपत खलाटे यांच्या हस्ते करण्यात आले तर याप्रसंगी सोलर इंडस्ट्रीजचे मॅनेजर श्री.वसंतराव वरारकर,पंचायत समिती सदस्य श्री.रामदास पुसाम,सरपंच सौ.सरपंच संगीता कोडापे, उपसरपंच श्री.रमेश काळे, तलाठी श्री.विनोद गेडाम, ग्रामसेवक श्री.मरापे, पोलीस पाटील बंडू भोंगळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.आबाजी धानोरकर,राजू धानोरकर,आशा वर्कर रंजना नगराळे, आरोग्य सेविका मरापे, गेडाम, ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
