अखेर स्वस्त धान्य दुकानां ना मिळाला बारा तासांचा अवधी जानरावभाऊ गीरी यांच्या तक्रार पत्राची दखल


राळेगांव तालुका प्रतिनिधी :रामभाऊ भोयर


लाँकडाऊन सुरु झाल्यावर स्वस्त धान्य दुकानाची वेळ सर्व शिधापत्रिका धारकां साठी खूप गैरसोयीची होती. ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव चे अध्यक्ष जानरावभाऊ गीरी यांनी या संदर्भात प्रशासना कडे तक्रार केली होती,त्या नुसार ही मागणी रास्त आहे हे गृहीत धरून नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी महाराष्ट्रातील सर्व स्वस्त धान्य दुकानां च्या वेळा सकाळी आठ वाजता पासून रात्री आठ असे बारा तास केल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे या बद्दल जानरावभाऊ गीरी यांनी कोरोणा संसर्ग टाळावा, या साठी ही वेळ वाढविल्या बद्दल शासनाचे आभार व्यक्त केले आहे .
सकाळी सात वाजता ते अकरा वाजे पर्यंत ही चार तासांची वेळ मजूर, गोर गरीब, जनतेसाठी खूप गैरसोयीची होती. एकच गर्दी धान्यं घेण्यासाठी उसळत होती.बऱ्याच जणांना वेळेअभावी धान्यं न मिळाल्याने परत जावे लागत होते. या अनुषंगाने ही तक्रार निवेदन देऊन न्याय द्या वा अशी मागणी केली होती.त्याला संबंधित विभागाने न्याय दिल्याने,शिधापत्रिकांमध्ये आनंदांचे वातावरण आहे….