प.पु. शेवंता आई व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी मधूकर कदम तर उपाध्यक्ष म्हणून गौरव देशमुख यांची बिनविरोध निवड

लता फाळके /हदगाव


तालुक्यातील निवघा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात निवघा येथील सर्व व्यापारी बांधवांची बैठक रविवार ( ता. १५ ) रोजी बोलावण्यात आली होती त्यामधून व्यापारी बांधवांच्या कार्यकारीणीचे नुतनीकरण करण्याचे ठरल्यावरून सर्व व्यापाऱ्यांच्या विचार विनिमयावरून संघटनेच्या नविन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली त्यामधे येथील भुसार व्यापारी मधूकर सोनबाराव कदम यांची अध्यक्ष म्हणून तर येथील कापड व्यापारी गौरव दत्तराव देशमुख यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांना मावळते अध्यक्ष भगवानराय शिंदे आणि उपाध्यक्ष अनंतकुमार जैन यांनी भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी बाजारपेठेतील बहू संख्य व्यापारी उपस्थीत होते. ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
    निवडीनंतर बोलतांना मधूकर कदम यांनी व्यापारी बांधवांना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी बाजारपेठेतील अनेक व्यापाऱ्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार केला.