
प्रतिनिधी:गुरुदास धारणे,चिमूर
लोकहीत महाराष्ट्र चिमूर ग्रुप ला जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा पत्रव्यवहार
चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराने शेतकऱ्यांचा शेतमाल सक्षम संस्थांच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांची आधारभूत देय रक्कम मिळवून देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला असता महत्प्रयासाने कोविड काळात शासनाने 42 कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली तरी मात्र प्रति क्विंटल मागे 700 रुपये राज्य शासनाने घोषीत केलेला बोनस देणे अजूनही प्रलंबित असल्याने लॉकडाऊन काळात शेतीहंगाम सुरु झाला असता शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी मित्र आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी तात्काळ दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित बोनस देण्याची मागणी करीत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना निवेदन दिले आहे .
चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी दि महाराष्ट्र स्टेट ऑफ कॉपरेटिव्ह फेडरेशन लिमी या सक्षम संस्थेने आधारभूत दराने धान खरेदी केली होती परंतु राज्य शासनाने धान खरेदीची रक्कम व बोनस देण्यास विलंब केल्याने कोरोना काळ दरम्यान बळीराजा हवालदील झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जात होता तेव्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी लक्ष घालून शासनाला वारंवार पत्रव्यवहार करून जेरीस आणीत अखेर दि 7 मे च्या दरम्यान 42 कोटी 88 लक्ष 74 हजार 666 रुपये शासनाने धान खरेदी ची मूळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली.
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या अथक संघर्षातून त्यांना यश आले असून कोरोना काळात मदत मिळवून दिली असली तरी शेतकऱ्यांचे हक्काचे बोनस देणे मात्र प्रलंबित ठेवले आहे प्रति क्विंटल 700 रुपये प्रमाने दिनांक १२ मार्च २०२१ नंतरच्या २२९५९०.२९ क्विंटल खरेदी धानाचे अंदाजे १६.०७ कोटी रुपयांचे बोनस थकीत आहे. सध्याची स्थिती कोरोना लॉक डाऊन असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यास साप्तनुक वागणूक दिली जात असून मात्र भंडारा व अन्य जिल्ह्यास प्राधान्य दिले जान्याची भिती वर्तवल्या जात आहे .
चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय आधारभूत दराने खरेदी केलेल्या धान मालाची नोंदणी नुसार शेतकऱ्यांना बोनस तात्काळ देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी केली आहे.
