


प्रतिनिधी:कल्पक ढोरे, वरोरा
गोरगरीब मजूर, डोक्यावर छप्पर नसलेल्यांना अन्नपुरवठा सेवा ग्रुप फाउंडेशन तरुणांची अन्नछत्र. व्यापारी शहर असलेला वरोरा शहरात मजूर, कामगारांची संख्या मोठी आहे. ताळेबंदीमुळे काम बंद असल्याने या कामगारांना एक वेळचा प्रश्न निर्माण झाला होता. या मजूर,कामगार, बेरोजगार,बेघर आणि सार्वजनिक ठिकाणी राहणारा व्यक्तींसाठी गेल्या दोन दिवसापासून वरोरा शहरातील सेवा ग्रुप फाउंडेशन अन्नछत्र चालवत आहे,त्यांच्या या उपक्रमामध्ये एक टाइम च्या जेवणाची व्यवस्था झाली आहे. मात्र आमचे काम पाहून अनेक नागरिक पुढे आले. त्यांनी तांदूळ, डाळ, गहू, भाज्या, तेल ,मसाला सारखे पदार्थ येऊन देत असतात. गेल्या दोन दिवसात. त्यामुळे आम्ही सध्या 1500 ते 2000 पर्यंत व्यक्तींना जेवण पोहोचवण्यात यशस्वी होत. आमच्या संस्थेचे तरुणांचे जिन्नस स्वच्छ करण्यापासून वितरित करण्यापर्यंत सर्व काम करीत असतात. यात अध्यक्ष निखिल मांडवकर, उपाध्यक्ष कृष्णा ढोके व सचिव वैभव ठाकरे. रोहित पिंपळशेंडे ,शांतनु कोरेकर ,अजिंक्य अंबाडे, देवेंद्र देठे, महेश बिबटे ,संकेत डाकरे, संस्कार येरमे ,दिपक बेंडे,भूषण झुंगरे, सुयोग घोटकर,अनुप पावडे, चेतन निकोडे यासारखे अनेक तरुण सहभागी झाल्याचे सेवा ग्रुप फाउंडेशन या सदस्याने सांगितले आहे.
