पावसाळा सुरू होताच प्रभाग क्र. 6 मध्ये पाण्यामुळे झाले स्विमिंग पूल तयार

हिंगणघाट प्रतिनिधी: प्रमोद जुमडे


नुकताच सुरू झालेल्या पावसाळ्यातला पहील्या पाण्यात प्रभाग क्रमांक ०६ मध्ये रस्त्यावर स्विमिंग पूल तयार झालेले आहेत, पावसाळा लागायच्या आधी ह्याची पूर्वसूचना विद्यमान नगरसेवकांना देऊनही त्यांनी याची दखल घेतली नाही त्यामुळे लोकांमधे नाराजगी आहे,
वाहत येणारे गडर व इतर सांडपाणी लोकांच्या घरात शिरत आहे त्यामुळे रोगराई चा मोठ्या प्रमाणात सामना स्थानीय लोकांना करावा लागत आहे., कोरोना चे सावट कसेबसे नियंत्रणात येत असताना नव्या रोगराई ला खुद प्रशासनाकडून दुजोरा देण्यात येत आहे असा आरोप एकता प्रतिष्ठान प्रमुख अखिल धाबर्डे यांनी केला असून त्वरित निकाल मार्गी न काढल्यास स्थानीय लोकांसोबत नगरसेवकांचा व नगर पालिका हिंगणघाट चा घेराव करण्यात येईल आणि प्रत्येक खड्ड्याला त्या लोकांची नावे देण्यात येईल जे स्वतःच्या जिम्मेदारी मधून पळ काढून सुस्त आहेत..