आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

लोकहीत महाराष्ट्र चंद्रपूर ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/G89E43ibblxErzEKGguOcb

चंद्रपुर: आज दिनांक 13 जुन 2021 रोजी सकाळी घुग्घूस येथे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख मा. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे यांच्या आदेशाने व युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश भाऊ बेलखेळे यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांच्या नेतृत्वात घुग्घूस कबड्डी ग्राउंड, आमराई वार्ड क्र.1 येथे युवा सेनेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी शिवसेना शहर प्रमुख सतीश बोंडे, गौतम वानखेडे, सुनील लोंणे, युवासैनिक कोमल ठाकरे, युवा सैनिक चेतन बोबडे, निखिल मोहितकर, सुरज चिकनकर, सचिन बोतले, अविनाश डोहे,सुमित कोहळे, सुमित सातपुते, रेहान कुरेशी, हर्षल बांदुरकर, राहुल बोबडे, हर्षल बजाई व इतर शिवसैनिक उपस्थित होते.