कलावंतांना जीवनावश्यक वस्तू ( किट ) चे नागोराव पाटणकर बहुद्देशीय संस्था ( नागपूर )तथा समाजसेवकांकडून वाटप

प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

कोरोना काळात व लॉकडाऊन सम्पलं असून सुद्धा कलावंत व कला सादर करून जगणाऱ्यावर हालकीची परिस्थिती आहे आणि आजची परिस्थिती बघता आज पर्यंत अन्य धान्य , जीवनावश्यक वस्तू खूप वाटप करण्यात आले परंतु या सामाज प्रबोधना मध्ये समाज जागृत करण्या करिता ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्याच कलावंतांन वर आज उपासमारीची वेळ आली असून त्यांचा कडे ना राजकीय किवा सामाजिक व थोर पुढारी लक्ष द्याला तयार नाहीत , म्हणून आज दिनांक 13/06/2021 रोजी नागोराव पाटणकर बहुद्देशीय संस्था ( नागपूर )तथा चंद्रपूर चा काही जबाबदार नागरिका कडून आज जुनोना चौक जवळील बुद्ध विहारा मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजक तथा आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध युवा गायक साहिल वागदे (भारती) यांचा सोबत राजेश चेडगुलवार ,मंगेश नगराळे, संगम शेरकर, श्रेयस वागदे ,सुजित चेडगुलवर ,कोमल ताई, रंजीता ताई, श्रावस्ती ताई, रोहिणी ताई, क्रेनिषाताई, मिंटीताई, इत्यादी युवा वर्गाणी हा कार्यक्रम पार पाडला व त्या करिता कार्यक्रमाचे आयोजन साहिल भारती यांनी आभार सुद्धा व्यक्त केले.