हिमायतनगर परिसरातील सर्वात मोठे हॉस्पिटलचा शुभारंभ लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न ,ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या नवीन इमारतीचा शुभारंभ संपन्न

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर


हिमायतनगर हदगाव, उमरखेड, भोकर, ईस्लापुर, सह शिवनी परिसरातील सर्वात मोठे ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दीं.13 जून रोजी शहरात उभारण्यात आल्याने आता परिसरातील रुग्णांना नांदेड सारख्या महागड्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने सर्व सोयी सुविधा देण्यासाठी सर्व आजारांवर एकाच छताखाली इलाज देण्यासाठी ओम मल्टी स्पेशलिस्ट ची एक नवीन इमारत उभी केली या हॉस्पिटलचे संचालक विश्वंभर अण्णा मादसवार यांचे लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांनी शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या सोयीचे व त्यांना परवडेल असे ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दिनांक 13 जून रोजी हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर ,हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय नेते माननीय श्री बाबुरावजी कोहळीकर साहेब, हिमायतनगर चे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल, पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी डी गायकवाड यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ संपन्न करण्यात आला खा.हेमंत भाऊ पाटील यांनी या हॉस्पिटल ला भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले व कोरोना महामारीच्या या कठीण काळात या परिसरातील नागरिकांना अशा हॉस्पिटलची गरज होती. गरजूं रुग्णांना हा सर्वात मोठा आधार झाला आहे, या हॉस्पिटल मुळे सर्व सामन्याचे मानसिक आणि आर्थिक त्रास आणि नुकसान वाचणार आहे या हॉस्पिटल चे डॉक्टर शिवप्रसाद लखंपत्रे साहेब,डॉक्टर माधव भुरके, डॉक्टर विजय करणवाड, डॉक्टर सुनील ढगे, डॉक्टर तुकाराम मुक्कावार, सह डॉक्टर प्रताप विमलबाई केशवराव यांच्या सर्व टीम चे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याप
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, विश्वंभर अण्णा मादसवार,नगराध्यक्ष कुणाल राठोड,माजी जी.पं.सदस्य ढोले बापू,बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख,शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे,तालुका संघटक संजय काईतवाड ,शहर उपप्रमुख रामभाऊ नरवाडे,शिवसेना किसान सेना आघाडी प्रमुख प्रकाशदादा जाधव,युवसेना उपजिल्हा प्रमुख योगेश चील्कावार ,वाळकेवाडी चे उपसरपंच संजय मानजाळकर,खरेदी विक्री संघाचे संचालक देवकते बापू,माजी उपनगराध्यक्ष जावेद गाणी, भाजप तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान ,रामभाऊ सूर्यवंशी परमेश्वर सुर्यवंशी राम जाधव खंडू चव्हाण यांच्या सह पत्रकार बांधव आणि हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.