भारत बंदला हिमायतनगर शहरातून प्रतिसाद,शहर कडकडीत बंद ,शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला शेतकरी आंदोलनास पाठिंबा

हिमायतनगर प्रतिनिधी


केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवरज ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास आज बारा दिवस झाले आहे कडाक्याच्या थंडीत विचार न करता पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या समोर मांडून आहेत मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे याच पार्श्‍वभूमीवर शेतकरी कायदे रद्द करण्यासंदर्भात हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, उप तांलुका प्रमुख विलास वानखेडे ,शहर प्रमुख प्रकाश रामदिनरवार, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, शंकर सलवार नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, नागेश शिंदे सह काँग्रेस चे तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक शेठ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश वानखेडे माजी नगराध्यक्ष अब्दुल आखिल ,शहराध्यक्ष संजय माने, जनार्दन ताडेवाड, सह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत दिनांक आठ डिसेंबर ला भारत बंद पुकारण्यात आला होता त्याला पाठिंबा देत शहर कडकडीत बंद ठेवले.

8 डिसेंबरला भारत बंद’च्या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार असल्याची माहिती काल हिमायतनगर शहरातील काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिमायतनगर शहरातील सर्व व्यापारी संघटनेस निवेदन देऊन हा बंद ठेवण्याची विनंती केली आज दि 8 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळपर्यंत शहरातील सर्व रहदारी टप्पू ठेवून या शेतकरी आंदोलनास सर्वांनी पाठिंबा देण्यात आला शेतकऱ्यांच्या भारत बंदला हिमायतनगर शहरातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र हिमायतनगर तहसीलदार यांना दिले आहे

यावेळी कॉंग्रेस चे तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर शहराध्यक्ष संजय माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफिक शेठ माजी नगराध्यक्ष अब्दुल आखिल, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, समद खान पठाण , गणेश शिंदे,माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते बाकी सेट, प्रकाश सावळे, साई सावळे,सुरज दांसेवार ,सचिन माने ,युवा तालुका अध्यक्ष मुन्ना होळकर, गोविं द बंडेवार, श्याम ढगे ,अंगत सुरोशे , रामदास रामदीनवर पंडित अण्णा ढोणे सह , शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे शहराध्यक्ष प्रकाश रामगिरवार ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे युवा शहराध्यक्ष अमोल धुमाळे संतोष सावळकर, नागेश शिंदे, शंकर चलमेल वर,सह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरदार खान, उदय देशपांडे सह आदी जणांनी या बंदला पाठिंबा दिला