पाहणारे डोळे आणि मदतीचे हात या संस्थेचे उपक्रम,उमरी गावात दुसऱ्यांदा कोविड लसीकरणाचे आयोजन

प्रतिनिधी:आशिष नैताम,पोंभुर्णा

लोकहीत महाराष्ट्र पोंभुर्णा ग्रुप ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/LC3lfxgx71N96uPh3IwW3j

पोंभुर्णा:- कोविड लासिकरणाराचा असलेला गैरसमज हा प्रत्येक गावोगावी – शहरामध्ये आपण पाहत येत आहोत. अनेक कित्येक दिवस झाले काही भागात लस उपलब्ध असून सुद्धा त्या परिसरातील लोक लस घेण्यास भित होते , मनामध्ये एक वेगळीच भीती निर्माण बाळगून लोक लस घ्यायला येत नव्हते . परिणामी केव्हा केव्हा लस वापस सुद्धा तशीच जायची, तर काही ठिकाणी लस घ्यायला एवढी लाईन असायची का लस पुरेशी पळत असे.
यातच पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार या गावात अशेच भीती चे वातावरण पसरल्याने लोक लस घेण्यास नकार द्यायचे, काही समजदार लोक लस पण घेतली पण ज्यांच्या मनात या लस संदर्भात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी गावातील काही सुशिक्षित युवक यांनी सुरू केलेली संस्था “पाहणारे डोळे आणि मदतीचे हात” बहुदेशिय संस्था उमरी पोतदार या संस्थेनी मागील पंधरा दिवसांपासून स्वतःच्या पातळीवर गावात सर्वेक्षण केला व लोकांच्या मनात असलेला गैरसमज समुपदेशनच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न मागील पंधरा दिवसांपासून सुरू होता आणि आज दिनांक १५ जून ला पाहणारे डोळे आणि मदतीचे हात बहुउद्देशीय सामाजिक संस्था व ग्रामपंचायत उमरी पोतदार यांच्या संयुक्त विद्यमाने गावांमध्ये कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पाहणारे डोळे आणि मदतीचे हात या संस्थेनी पुढे येत कोविड लसीकरण जनजागृती सर्वे करून लोकांच्या मनातील भीती दूर करून आज गावांमध्ये यशस्वी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये उपस्थित आरोग्य सेवक श्री. पी. बी. ढोणे ,आरोग्य सेविका सौ. एम. बी. मेश्राम , सरपंच ठामेश्वरी लेनगुरे, मंगेश उपरे उपसरपंच , राकेश मडावी चपराशी व संस्थेचे अंकुश उराडे, निखिल झबाडे, चंद्रकांत सिडाम, मनीष ठाकरे, निखल झुरमुरे, भीमराव मेश्राम, विक्रम लेनगुरे, अविनाश लेनगुरे, नदीम कुंभरे, अमित कुंभरे, चेतन कावळे हे उपस्थित होते.