माळी समाज पोंभूर्णाच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांना आदरांजली अर्पण

महात्मा ज्योतीबा फुलेंचे विचार घरा घरात पोहचवा…भुजंग ढोले

पोंभूर्णा:- शिक्षणाची मुहुर्त मेढ रूजविनारे महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती दि.११/०४/२०२१ ला संपूर्ण देशात मोठ्या हर्ष उल्लासाने साजरी करन्यात आली अनेक हाल अपेष्टा सहन करून समाज सेवेत आपले संपूर्ण आयूष्य खर्ची घालून सर्वांसाठी शिक्षणाचे दारे उघडून देनारे महात्मा फुले भारतीय शिक्षण प्रणालीचे खरे मानकरी आहेत महात्मा फुलेंची जयंती सर्वत्र साजरी करन्यात आली या शुभदिनाचे औचित्य साधून पोंभूर्णा माळी समाज बांधवांनी महात्मा फुलेंना आदरांजली अर्पण करन्याकरीता श्री.भुजंगजी ढोले यांचे निवासस्थानी शासनाच्या नियमांचे पाल करून कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलीत करून आदरांजली अर्पण करन्यात आली या प्रसंगी भुजंगजी ढोले,सौ.योगीता गुरुनुले माजी अध्यक्ष माळी समाज पोंभूर्णा,सौ.सुलभा ढोले,श्री.मारोती निकोडे,श्री.वसंत मोहुलै,उमेश गुरनुले,सौ.मीराबाई ढोले,विठाबाई मोहुलै,ज्योतीबाई गुरनुले,शुभांगी गुरनुले,गयाबाई मोहुलै आदि समाज बांधव प्रामुख्याने उपस्थीत होते