शेतातील गारपिटी च्या चुकीच्या सर्व्हे मुळे खरे लाभार्थी अनुदान पासून वंचित

प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव



तालुक्यातील तालंग या गावी 2018 – 2019 या वर्षी झालेला गारपिटी चा सर्व्हे हा तलाठी नी गावात राजकिय पुढाऱ्यांच्या घरी बसुन सबंधित व्यक्तिच्या सांगण्यावरून अंदाजे केला त्यामुळे खरे लाभार्थी अनुदान पासून वंचित राहिले आहेत. आधीच शेतकरी निसर्गाच्या लहरी पणामुळे मेटाकुटीस आला असताना शासनाचे लाभ सुद्धा मिळत नाहीत म्हणुन अशा वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांचा पुन्हा सर्वे करून त्यांना लाभ मिळवून द्यावा अन्यथा तलाठी ने त्यांच्या चुकीच्या पद्धतीमुळे जे शेतकरी अनुदानपासून वंचित आहेत त्यांना स्वत : भरपाई द्यावी. असे निवेदन गजानन पतंगे व गावातील सर्व वंचित शेतकर्‍यांनी हदगाव तहसीलदार ना दिले.