
.
प्रतिनिधी:चैतन्य कोहळे,भद्रावती
भद्रावती जवळ असलेल्या कर्नाटका एम्टा माईस मध्ये स्थानिकांना रोजगार देण्यासाठी भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी पुढाकार घेतला आहे. हे माईन्स डिसेंबर 2020 ला पुनश्च सुरू करण्यात आली आहे. त्यावेळी स्थानिकांना रोजगार देण्यासंदर्भात खदान प्रशासनाने आश्वासन दिले होते पण सात महिने लोटून सुद्धा वारंवार निवेदन देऊन कोणत्याही प्रकारच्या स्थानिकांना कामावर घेण्यात आले नाही. शासनाच्या स्थानिकांना ८०% टक्के रोजगार देण्याच्या आदेश असताना त्या आदेशाची कोणत्याही प्रकारे पूर्णता केल्या जात नसून अंदाजे तीनशे कामगार बाहेर राज्यातून कामावर आणण्यात आलेले आहे. तरी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार लावा आणि वोल्वो ट्रक ड्रायव्हर कोरोना महामारी च्या काळात उपासमारीचा जड सोसत आहे पण स्थानिकांना कोणत्या प्रकारचा रोजगार कंपनीकडून देण्यात आलेला नाही.स्थानिकांची ही दशा बघून.
आज तहसीलदार साहेब भद्रावती यांचेकडे स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी निवेदन सादर केले आहे. याविषयीच्या सूचना आधीच माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी तहसीलदार साहेब तसेच कर्नाटका प्रशासनाला दिल्या होत्या. वानखडे यांनी पाच दिवसाचा अल्टिमेट वेळ देऊन कर्नाटका एम्टा प्रशासनाला अवगत केले आहे की स्थानिकांना काम द्या नाहीतर खदान बंद पाडू असा इशारा दिला आहे. यावेळेस भाजपा युवा मोर्चाचे विस्मय बहादे, गणेश खरवार, जसवंत सिंह व शिवशंकर मडावी हे उपस्थित होते.
