
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी वर्गा मध्ये पावसा अभावी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी अखेर लहान मुलांच्या अंघोळी पाडलेले गीत त्यांच्या ओठावर येऊ लागलेअसे येरे पावसा तुला देतो पैसा. या म्हणीचा देखील वापर शेतकरी करताना आढळून आले यावर्षी पाऊसाने सुरुवात लवकर केलीत्यामुळे पावसाळा यावेळी चांगल्या प्रकारे होईल असे वाटु लागले तसे हवामान खात्याने अंदाज देखील सागितला होता त्यामुळे महागाई चे बियाणे आणुन शेतकऱ्यांनी पेरणी केली उगवण चांगली पण गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेचे वाढ झाली येणारा प्रत्येक दिवस रिकामा जात रात्री आकाश बघुन झोपायच आणि सकाळी उठून पुन्हा बघायची वेळ शेतकऱ्यांवर आली एकीकडे महारी तर दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट काय करायचं शेतकऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित झाला आहे जर का एक दिवसात मेघराजा नाही बरसला तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय नाही मग दुबार पेरणी करायची कशी पेसा नाही दुसरीकडे बाजारात बियाणे उपलब्ध मग पर्याय काय हा देखील प्रश्न निर्माण होऊ लागलासरकार काही मदतीला धावून येईल का?जरी अला तर माझ्या बळीराजा पर्यंत येईल अनेक शेतकऱ्यांना पडलेले प्रश्नआहेत त्यामुळे शासनाने यांचे नियोजन आतापासूनच केले तर येणाऱ्या काळात शेतकरी वर्गाचे हित जोपासले जाईल अशी चर्चा हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी वर्गा मध्ये होताना दिसत आहे.
