रोजगाराच्या ज्वलंत प्रश्न साठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कर्नाटक एम्टा कॉल माईस कंपनीचे काम बंद

प्रतिनिधी:चैतन्य कोहळे

रोजगाराच्या ज्वलंत प्रश्न साठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कर्नाटक एम्टा कॉल माईस कंपनीचे काम बंद करण्यात आले स्थानिक बेरोजगार व महिलांनी त्यांच्या आत मध्ये घुसून सर्व माईन्स ट्रक्स आणि मशीन बंद करून चक्काजाम केलेला आहे संपूर्ण खदान पूर्णपणे बंद झालेली असून भरपूर दिवसापासून याबाबत संघर्ष चालू होता वारंवार प्रशासनाला व कंपनीला आणि मागण्या करून सुद्धा कोणते प्रकारचे यश आले नसल्यामुळे स्थानिकांनी चक्काजाम केलेला आहे आंदोलनस्थळी लवकरच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे पोहोचत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे.