ज्येष्ठ शिवसैनिक सितारामजी भुते यांनी शिवसैनिक घर घर अभियानाला केली सुरुवात

प्रतिनिधी हिंगणघाट: प्रमोद जुमडे.

शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिव संपर्क घरघर अभियानाला ज्येष्ठ शिवसैनिक सितारामजी भुते यांनी जोरदार सुरुवात केली आहे त्यांनी ही सुरुवात दिनांक 12 तारखेपासून केली असून यात संत तुकडोजी वार्ड येथून सदस्य नोंदणीला सुरुवात केली आहे या वेळी शिवसेना पक्षाचे ध्येय धोरण समजावून सांगण्यात आले की 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हीच वंदनीय बाळासाहेबांची शिवसैनिकांना देन व शिकवण होती. असे सितारामजी भूते यांनी मार्गदर्शन केले यावेळी सुनील आष्टीकर धनराज तुपट आदी शिवसैनिक उपस्थित होते दोन दिवसात तीनशे सभासद या अभिनयात अभियानात जोडले गेले असून ज्येष्ठ शिवसैनिक असून सुद्धा जे कार्य सितारामजी भुते हे करीत आहे त्यामुळे यूवा शिवसैनिकांना एक प्रकारचे नवसंजीवनी मिळत असल्याचे दिसून येत आहे.सभासद नोंदणी मध्ये तुकडोजी वार्ड, शाखा प्रमुख सुरेश तांदूळकर, नारायण राव इठेकर,राजू होळकर, विजय पंढरपूरे, परवीन धनवंत, मुरलीधरराव बर्डे,इत्यादी व दुसऱ्या दिवशी शास्त्री वार्ड येथील भगवानजी गोहने, जगदीश हेडावू,फिरोज खान पठाण, महेश तुपट,सुनील पारखेकर, अक्षय तपासे, बंटी शाऊ,अजय वटे,किडीस झुलनसिंग, सुरेश कानकाटे, इत्यादी चे या अभियानाला सहकार्य लाभले.