अपघात: भाजी विक्रेत्या महिलेच्या अंगावर गाडी चढविल्याने जागीच मृत्यू, चालक फरार

प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक(सटाणा)

सटाणा कडून ठेंगोडा कडे एम एच 42 K 517 या क्रमांकाची गाडी भर धाव चालवत असताना वाहनाने अचानक सावकी मार्गाने टर्न घेतल्याने बाजूला असलेल्या भाजी विक्रेत्याच्या अंगावर गाडी चढविल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या भाजी विक्रेत्या सरलाबाई दादाजी अहिरे(42) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनस्थळावरून चालकाने वाहन सोडून पळ काढला. त्यामुळे चालकांविरुद्ध सटाणा पोलीस स्टेशन येथे कलम 279,304 अ,337,338 ,मोटर व्ही. ऍक्ट कलम 184,134/177 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.