विद्यार्थ्यांनी शिक्षणाबद्दलची आवड कमी करू नये :- मुख्यध्यापक धनराज काळे

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार,कोरपना

सावित्रीबाई फुले महाविद्यालय गडचांदूर च्या माध्यमातून कुसळ येथे शिक्षण आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन

कोरपना :- कोरोनाच्या विश्वसंकटात राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद आहेत. अश्यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावित्रीबाई फुले महाविद्यालय गडचांदूर येथील शिक्षकांनी शिक्षण आपल्या दारी उपक्रम तालुक्यात सुरु केले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल ची आवड कमी होऊ नये. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची आवड निर्माण करावी. या हेतूने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. असे मत मुख्याध्यापक धनराज काळे यांनी व्यक्त केले.कुसळ येथे आज दि. 28/7/2021 ला सावित्रीबाई फुले महाविद्यालय गडचांदूर च्या माध्यमातून शिक्षण आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक पद्धत, भविष्यात करावयाचा अभ्यास, ऑनलाईन शिक्षण पद्धती बदल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पुस्तकांचे वितरण प्रतिष्टीत नागरिक आनंदराव थेरे यांच्या हस्ते करण्यात आले.या उपक्रमाला माजी जिल्हापरिषद सदस्या सुधाबाई सिडाम, सरपंच वसंतरावजी मडावी यांनी भेट दिली असता त्यांनी सावित्रीबाई फुले महाविद्यालयाने सुरु केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमाला माजी जिल्हापरिषद सदस्या सुधाबाई सिडाम, सरपंच वसंतरावजी मडावी, मुख्याध्यापक धनराज काळे, गावातील प्रतिष्टीत नागरिक कुसळ व धानोली परिसरातील पालक व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.उपक्रम यशस्वीतेसाठी चंद्रभानजी किन्नाके (शिक्षक) सीताराम आत्राम (शिक्षक) यांनी प्ररिश्रम घेतले.