
आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे)येथे राळेगांव तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या उदात्त हेतूने राळेगांव शहरातून थेट रुग्णालयात उपचारार्थ जाण्यासाठी मोफत बससेवा सुरु झाली आहे. या बस ला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला आहे. कोरोणा महामारी च्या काळात ही बससेवा दिड वर्षापासून बंद होती.ही बस दररोज सकाळी नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगांव च्या दर्शनी फाटका समोरुन सुटेल असे आयोजकथांनी सांगितले या वेळी बस ची विधीवत पूजन करुन ,चालकाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला…
या वेळी पद्माकरराव ठाकरे महाराज, रंजनभाऊ आष्टकार, कमलेशजी गहलोत, राकेशभाऊ राऊळकर, संदीपभाऊ पेंदोर,इमरानभाई पठाण, किशोरभाऊ भेरे, जगदीशजी सरदार व गाव सेना प्रमुख प्रदीपभाऊ कडू यांना मोफत बस सेवा सुरू करण्यात यश मिळाले.
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
