वेकोलीच्या भोंगळ कारभाराविरोधात माजरीवासीयांचे आंदोलन ,संतप्त नागरिकांनी रेल्वे सायडिंग पाडली बंद

प्रतिनिधी: चैतन्य राजेश कोहळे


वीज, पाणी व वेकोली मुळे निर्माण झालेल्या अनेक समस्या करिता गावकऱ्यांनी आज जन आंदोलन करून वेकोली माजरी च्या सिएचपीची रेल्वे सायसडिंग बंद पाडली. या आंदोलनात महिला व लहानमुले ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

आज सकाळी दहा वाजता पासून मोठ्या प्रमाणात लोक रेल्वे सायडिंगवर गोळा झाले. व रेल्वे व्हेगन भरत असलेली पीसी मशीन बंद पाडली या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या तथा सामाजिक कार्यकर्ता ताहीरबानो मोहम्मद शेख होत्या. वेकोलिने लोकांचे वीज पुरवठा कापून माजरी च्या संपूर्ण जनतेला अंधारात राहण्यास भाग पाडले. वेकोलिच्या प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात गेले. वेकोली च्या ब्लास्टिंग मुळे अनेक घरे पडले, अनेक घराला भेगा पडल्या, खाजगी ट्रान्सपोर्ट लिमिटेड कंपनी असताना सत्तर टक्के स्थानिकांना रोजगार देणे हा कायदा असुन गावातील सुशिक्षित तरुणांना घेतले नाही. नाली सफाई नाही, जागो जागी कचऱ्याचे माहेर घर बनून असून वेकोली प्रशासन जन समस्या कडे लक्ष न देता पाठ फिरविल्या मुळे माजरीच्या जनतेने या समस्येवर वेकोली जेंव्हा पर्यंत तोडगा काढत नाही तेंव्हा पर्यंत जन आंदोलन सुरू राहील अशी भूमिका घेतली होती. दोन तासातच वेकोली अधिकारी आणि पोलीस प्रशासन आंदोलन स्थळावर पोहोचले व आंदोलन कर्त्यांच्या शिष्टमंडळास बैठकीस आमंत्रित केले. वेकोली माजरी च्या सबएरिया ऑफिस मध्ये बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य प्रवीन सूर, पंचायत समिती सदस्य माजी सरपंच बंडू बनकर, ग्रामपंचायत सदस्या ताहिरा बानो शेख, सीमा भारती, माजी ग्रामपंचायत सदस्य उल्हास रत्नपारखी, कंकय्या पोतराम तसेच वेकोली चे उपमहाप्रबंधक आर बी वर्मा, कार्मिक प्रबंधक राजेश नायर, थोरात माजरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार विनीत घागे, भद्रावती तहसीलचे मंडळ अधिकारी गुणवंत वाभीटकर,माजरी तलाठी विलास एम. शंभरकर यांचे सोबत चर्चा झाल्यानंतर वेकोलीने अनेक मागण्या मान्य केल्या आणि वीज पुरवठा बाबत वेळ मांगीतली व आश्वासन दिले. त्या नंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.